Thumbnail for 1 आर, 1 गुंठा, 1 एकर, 1 हेक्टर व 1 बीघा म्हणजे किती ? Meaning of R, Guntha, Acre, Hectare & Bigha by ज्ञान मराठी

1 आर, 1 गुंठा, 1 एकर, 1 हेक्टर व 1 बीघा म्हणजे किती ? Meaning of R, Guntha, Acre, Hectare & Bigha

ज्ञान मराठी

3m 11s424 words~3 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:00]मित्रांनो, शेत जमीन मोजण्यासाठी आपण गुंठा, एकर, हेक्टर वगैरे अशी वेगवेगळी मोजमापे वापरत असतो.
[0:00]गुंठा, १ गुंठा म्हणजे ३३ फूट * ३३ फूट, कोणत्याही जमिनीचे क्षेत्रफळ ३३ फूट बाय ३३ फूट असेल, तर ती जमीन १ गुंठा असते.
[0:00]जमिनीची मोजमाप आर मध्ये असेल, तर त्या आरला १०७६.३९ ने गुणायचे व आलेल्या उत्तराला १०८९ ने भागायचे.
[0:00]बिघा, मित्रांनो बिघा हे भारत, नेपाळ व बांग्लादेश मध्ये जमीन मोजण्याचे एक जुने माप आहे.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]नमस्कार मित्रांनो, तुमचं ज्ञान मराठी या YouTube चॅनेलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, शेत जमीन मोजण्यासाठी आपण गुंठा, एकर, हेक्टर वगैरे अशी वेगवेगळी मोजमापे वापरत असतो. त्याचबरोबर ७/१२ उताऱ्यामध्ये सुद्धा अशी वेगवेगळी मोजमापे दिलेले असतात. परंतु अजूनही बऱ्याच जणांचा या मोजमापांमध्ये गोंधळ होतो. तेव्हा आज आपण आर, गुंठा, एकर, हेक्टर व बिघा म्हणजे किती ते जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. घंटी दाबा व ऑल वरती क्लिक करा. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आर, मित्रांनो आर हे मेट्रिक पद्धतीत क्षेत्रफळ मोजण्याचे एक माप आहे. १ आर म्हणजे १०० चौ.मी. याचे रूपांतर जर चौरस फुटात केले, तर १ आर म्हणजे १०७६.३९ चौ.फूट असते. गुंठा, १ गुंठा म्हणजे ३३ फूट * ३३ फूट, कोणत्याही जमिनीचे क्षेत्रफळ ३३ फूट बाय ३३ फूट असेल, तर ती जमीन १ गुंठा असते. १ गुंठा म्हणजेच १०८९ चौ.फूट. याचे रूपांतर जर चौरस मीटरमध्ये केले, तर १ गुंठा म्हणजे १०१.१७१४ चौ.मी. असते. बरेच जण १ गुंठा म्हणजे १ आर असे समजतात. परंतु १ आर व १ गुंठ्यामध्ये फरक आहे. १ आर म्हणजे १०७६.३९ चौ.फूट म्हणजेच १०० चौ.मी. असते व १ गुंठा म्हणजे १०८९ चौ.फूट म्हणजेच १०१.१७१४ चौ.मी. असते. तर आता आरचे रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे ते जाणून घेऊ. जमिनीची मोजमाप आर मध्ये असेल, तर त्या आरला १०७६.३९ ने गुणायचे व आलेल्या उत्तराला १०८९ ने भागायचे. अशा पद्धतीने तुम्हाला आर मध्ये दिलेले मोजमाप गुंठ्यामध्ये मिळेल. एकर, १ एकर म्हणजे ४० गुंठे. याचे चौरस फुटात रूपांतर केले, तर १ एकर म्हणजे ४३,५६० चौ.फूट. तसेच चौरस मीटरमध्ये रूपांतर केल्यास १ एकर म्हणजे ४०४६.८५६ चौ.मी. हेक्टर, १ हेक्टर म्हणजे १०० मीटर गुणिले १०० मीटर. जमिनीचे क्षेत्रफळ १०० मीटर बाय १०० मीटर असेल, तर ती जमीन १ हेक्टर असेल. हेक्टरचे एकर मध्ये रूपांतर केले, तर १ हेक्टर म्हणजे २.४७ एकर असते. म्हणजेच १ एकर ०.४० हेक्टर एवढे असते. हेक्टरचे रूपांतर गुंठ्यात केले, तर १ हेक्टर म्हणजे ९८.८४ गुंठे असते. १ हेक्टर १०,००० चौ.मी. एवढे असते. तसेच १ हेक्टर म्हणजे १,०७,६३९.१० चौ.फूट असते. बिघा, मित्रांनो बिघा हे भारत, नेपाळ व बांग्लादेश मध्ये जमीन मोजण्याचे एक जुने माप आहे. महाराष्ट्रात याचा वापर कमी होतो. राजस्थान, हरियाणा, गुजरात, आसाम, पंजाब, बिहार या राज्यांमध्ये याचा उपयोग केला जातो. आणि प्रत्येक राज्यांमध्ये बिघाची मापे वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात १ बिघा म्हणजे २० गुंठे मानले जाते. हरियाणा मध्ये ५ बिघा म्हणजे १ एकर मानले जाते. उत्तर प्रदेश मध्ये १.६ बिघा म्हणजे १ एकर मानले जाते व राजस्थान मध्ये १ बिघा १ एकर पेक्षा थोडे लहान असते. तर आता तुम्हाला समजले असेल, आर, गुंठा, एकर, हेक्टर व बिघा म्हणजे किती? तर अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript