Thumbnail for Marathi Book Review | Abol Prit Baharali Review | EP 13 by Pustak Marathi

Marathi Book Review | Abol Prit Baharali Review | EP 13

Pustak Marathi

3m 25s439 words~3 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:00]पुस्तकाच्या मागील बाजूस कादंबरीच्या लेखिका शोभा राऊत यांचा फोटो आहे आणि खाली वितरकांबद्दल लिहिलेलं आहे.
[0:00]शोभा राऊत यांनी लिहिलेली अवचित होता भेट तुझी ही लव्ह स्टोरी असलेली कादंबरी आपण मागे पाहिली.
[0:00]तुम्हाला या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे.
[0:53]हा आहे या कथेचा नायक आणि नायिका आहे त्याच कॉलेजमध्ये एसवायबीएला शिकत असलेली तापट डोक्याची पण कॉलेजची हुशार विद्यार्थिनी अनघा भोसले.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]लव्ह स्टोरी सगळ्यांनाच वाचायला आवडत. अशीच एक लव्ह स्टोरी म्हणजे अबोल प्रीत बहरली. लेखिका शोभा राऊत यांची ही पहिली कादंबरी. ही कादंबरी त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी लिहिली. या पुस्तकाचे पब्लिकेशन आहे रिया पब्लिकेशन. या पुस्तकाचा मुखपृष्ठ केलयं चित्र मित्र पब्लिसिटी यांनी. मुखपृष्ठावर कपलचा फोटो आहे. वरच्या बाजूस लेखिकेचं नाव आणि खालील बाजूस पुस्तकाचं नाव लिहिलं आहे. पुस्तकाच्या मागील बाजूस कादंबरीच्या लेखिका शोभा राऊत यांचा फोटो आहे आणि खाली वितरकांबद्दल लिहिलेलं आहे. शोभा राऊत यांनी लिहिलेली अवचित होता भेट तुझी ही लव्ह स्टोरी असलेली कादंबरी आपण मागे पाहिली. तुम्हाला या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आता वळूया पुस्तकाच्या कथे कडे.

[0:53]आयुष्यामध्ये प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात पडत असतो. मित्रांच्या मैत्रिणींच्या किंवा शिक्षकांच्या. शिक्षकांच्या? हो बरोबर ऐकलं तुम्ही शिक्षकांच्याच. अशीच काहीशी कथा आहे या पुस्तकाची. कॉलेजचा माजी विद्यार्थी जो नुकताच एमएड पास होऊन कॉलेजमध्ये लेक्चरशिप करत असतो. त्याचं नाव अभिजित देशमुख. हा आहे या कथेचा नायक आणि नायिका आहे त्याच कॉलेजमध्ये एसवायबीएला शिकत असलेली तापट डोक्याची पण कॉलेजची हुशार विद्यार्थिनी अनघा भोसले. पण अनघा आणि अभिजित या दोघांची ओळख होते ती भांडणापासून. हळूहळू जसे जसे दिवस पुढे जातात तस तसा त्यांच्यातलं भांडण अजून विकोपाला जातं. इतकं की ते दोघं एकमेकांचा नाव सुद्धा घेत नसतं. आणि याच रागाचं कधी प्रेमात रूपांतर होतं हे त्यांना सुद्धा कळत नाही. या दोघांचं भांडण मग त्यांच्या भांडणातून फुलणारं प्रेम ही अबोल प्रीत वाचताना खूप मजा येते. शोभा राऊत यांच्या कथा वाचताना छान वाटतंच. या कथेत अजून एक लव्ह स्टोरी आहे. अभिजित आणि अनघाचे भांडणं आणि अबोल प्रीत चालू असताना रवी आणि पल्लवी सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडतात. रवी हा अनघाचा मोठा भाऊ पल्लवी ही अभिजितची मावस बहीण. रवी हा अभिजितचा आवडता विद्यार्थी म्हणून त्याचं नेहमी अभिजितच्या घरी येणं जाणं होत असे. तेथे त्याची आणि पल्लवीची ओळख होते आणि त्यांचं प्रेम जुळतं. पण इथे अनघा आणि अभिजित यांच्यातील भांडणामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असतो. त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं पण तिचं माझ्यावर प्रेम नसेल किंवा त्याचं माझ्यावर प्रेम नसेल असं दोघांना वाटत असतं. त्यामुळे ते खूप दुःखी असतात. रवी आणि पल्लवीला त्या दोघांबद्दल सगळं कळतं आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे सुद्धा कळतं. पण त्या दोघांनी स्वतःहून एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली द्यावी म्हणून पल्लवी आणि रवी एक प्लॅन करतात. त्यात अभिजितच्या आईला पण सहभागी करतात व शेवटी ते आपली अबोल प्रीत एकमेकांना सांगतात अशी ही कथा. अभिजित आणि अनघा यांच्यात उडत असलेले खटके आणि नकळत होत असलेलं प्रेम हे वाचताना मजा येते. लव्ह स्टोरी वाचायला आवडणाऱ्यांनी ही कादंबरी नक्की वाचावी. तुम्हाला नक्की आवडेल. एक वाचक म्हणून मी देतो या कादंबरीला पाच पैकी अडीच स्टार. मराठी पुस्तकांबद्दल जाणून घ्यायला आणि त्यांचे रिव्ह्यूज पाहायला पुस्तक मराठीला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript