Thumbnail for Grandma Marathi Stories 01 | Marathi Goshti | Topiwala Ani Makde | The Clever Capseller by Pebbles Marathi

Grandma Marathi Stories 01 | Marathi Goshti | Topiwala Ani Makde | The Clever Capseller

Pebbles Marathi

1m 6s127 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:08]त्याच्या पिशवीतून रंगीबेरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि परत झाडावर जाऊन बसली.
[0:08]टोपीवाल्याने लगेच त्या सगळ्या टोप्या जमा केल्या आणि पिशवीत भरून तिथून आनंदाने निघून गेला.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]चतुर टोपीवाला एक दिवस एक टोपीवाला एका छोट्याशा गावात टोप्या विकायला गेला.

[0:08]उन्हात फिरून तो अगदी दमून गेला होता. एका मोठ्या झाडाखाली त्याने आपल्या टोप्यांची पिशवी ठेवली आणि बाजूलाच झोपी गेला. टोपीवाला झोपेत असताना त्या झाडावरून माकडं खाली उतरली. त्याच्या पिशवीतून रंगीबेरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि परत झाडावर जाऊन बसली. थोड्या वेळाने टोपीवाला जागा झाला. बघतो तर काय पिशवी रिकामी आणि सगळी माकडं झाडावर टोप्या घालून बसली होती. तो जोरात ओरडला, अरे त्या टोप्या माझ्या आहेत मला परत द्या. माकडं पण झाडावरून त्याच्या अंगावर ओरडू लागली. तेवढ्यात त्याला एक उपाय सुचला. त्याने डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. त्याचबरोबर सगळ्या माकड्यांनी आपापल्या टोप्या काढून जमिनीवरती फेकल्या. टोपीवाल्याने लगेच त्या सगळ्या टोप्या जमा केल्या आणि पिशवीत भरून तिथून आनंदाने निघून गेला. कठीण प्रसंगातून निघण्याचा मार्ग असतोच.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript