[0:00]या महाराष्ट्र विधानसभेचा अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस वर बरीचशी चर्चा त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. जे विद्यार्थी नीट यूजी 2026 ची तयारी करत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचा ऍडमिशन पूर्वी झालेला आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा विषय विधानसभेमध्ये लक्षवेधी चर्चेमध्ये चर्चेला गेलेला आहे. बीएचएमएस डॉक्टरांना एलोपॅथी प्रॅक्टिस मिळावी का याविषयी ही चर्चा होती त्याचबरोबर जिपमर पॉन्डिचेरीनी जे काही बीएमएस आणि एमबीबीएस या दोन्हींना एकत्रित करून जो काही इंटीग्रेटेड कोर्स करण्याचा जो काही माणस मागच्या काही दिवसांमध्ये बोलून दाखवलेला होता. त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे या संपूर्ण घटनांचा थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्या ठिकाणी परिणाम होणार आहे. नेमकी काय चर्चा आहे काय मुद्दे आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मी अंकुश पाटील तुम्ही पाहत आहेत श्री छत्रपती अकॅडमी पुणेच youtube चॅनल नीट यूजी 2026 चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन पर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या या youtube चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या youtube चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या whatsapp चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं whatsapp चॅनल त्या ठिकाणी जॉईन करू शकता. मूळ मुद्दा हा आहे की भाजपचे जे काही आमदार आहेत डॉक्टर तुषार राठोड यांनी विधानसभेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे. सध्याच्या घडीला जे काही बीएचएमएस डॉक्टर आहेत त्यांना एक वर्षाचा फार्माकोलॉजीचा सीसीएमपी कोर्स केल्यानंतर मेडिकल काउन्सिल महाराष्ट्राचं जे काही मेडिकल काउन्सिल आहे त्याच्याकडे रजिस्टर करून एलोपॅथीची काही प्रमाणात प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि त्याचं स्वतंत्र पोर्टल त्या ठिकाणी तयार करून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे. तब्बल महाराष्ट्र राज्यातून 8000 विद्यार्थ्यांनी हा कोर्स केल्यानंतर आता रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 2000 प्लस विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे. या विद्यार्थ्यांना काही आजारांवर एलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परमिशन त्या ठिकाणी मिळणार आहे यालाच विरोध करत आमदार जे आहेत तुषार राठोड यांनी या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. त्यांचा नेमका विरोध काय आहे आणि या विरोधाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय राज्यमंत्री जे काही आहे माधुरीताई मिसाळ यांनी काय उत्तर दिलेलं आहे याविषयी सुद्धा डिटेल जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर बीएमएस आणि एमबीबीएसचा जो काही इंटिग्रेटेड कोर्स आहे याविषयी नेमकी काय चर्चा झालेली आहे ते सुद्धा मुद्देसूत पाहणार आहोत. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय पार्श्वभूमी आणि महत्त्व ग्रामीण आणि निमशहरी भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने हा विषय प्रशासकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे.
[3:41]पुढे जाण्यापूर्वी नीट यूजी 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउंसलिंग सर्विसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेकडे पेड काउंसलिंग सर्विस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या स्क्रीनवर त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउंसलिंग सर्विस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज कट ऑफ पाहायचे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं स्वतंत्र ऑनलाइन एप्लीकेशन आहे. ऑनलाइन एप्लीकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. वैद्यकीय सेवांची सद्यस्थिती आणि कमतरता तज्ञ डॉक्टरांची वानवा भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात अजूनही एमडी किंवा एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाण गरजेपेक्षा खूपच कमी आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आणि प्राथमिक आरोग्य सेवा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी, इतर वैद्यकीय शाखांमधील जसे की होमिओपॅथी डॉक्टरांना प्रशिक्षित करून पर्यायी व्यवस्था उभी करणे गरजेचे ठरत आहे. जर आपण तालुका प्लेस किंवा ग्रामीण भागात जर बघितलं तर एमबीबीएस डॉक्टर पेक्षा जास्त डॉक्टरांची संख्या कुठली आहे तर ते बीएमएस डॉक्टर आहेत. त्याचबरोबर बीएचएमएस डॉक्टर आहेत. हे डॉक्टर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय पातळीवर म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवर बीएमएस डॉक्टरांना विशेष ट्रेनिंग देऊन एलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठीचा जो काही एमबीबीएस आणि बीएमएस मिळून एक पाच वर्षाचा इंटीग्रेटेड कोर्स सुरू करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. जिपमर पॉन्डिचेरी यांनी हा पुढाकार घेतला होता. या संदर्भातल्या बातम्या तुम्हाला गुगलवर त्या ठिकाणी सापडतील आणि नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने बीएचएमएस डॉक्टरांना सुद्धा काही किरकोळ आजारावर एलोपॅथीचे औषध सजेस्ट करण्याची परवानगी देण्यासाठी एक वर्षाचा जो काही कोर्स आहे. बीएचएमएस झाल्यानंतर एक वर्षाचा सीसीएमपी कोर्स हा फार्माकोलॉजी कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर बीएचएमएस डॉक्टरांना त्या ठिकाणी ऑनलाइन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून प्रमाणपत्र मिळून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्याची जी काही पर्यायी व्यवस्था आणि त्याचं स्वतंत्र पोर्टल जे आहे ते आता सुरू झालेलं आहे. 8000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हा कोर्स केल्याची माहिती विधानसभेत मांडलेली आहे आणि त्यापैकी जवळपास 2000 प्लस विद्यार्थ्यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. आता या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल काउंसलिंगकडे रजिस्टर करता येतं आणि यानंतर याला विरोध काय होतोय की याला विरोध हा होतोय की हे विद्यार्थी महाराष्ट्र मेडिकल काउंसलिंगकडे रजिस्टर झाल्यानंतर रेगुलर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून त्या ठिकाणी काम करतील. आणि मग यांच्यामध्ये आणि एमबीबीएस मध्ये काही त्या ठिकाणी फरक उरणार नाही हा मुख्य मुद्दा जो काही आहे तो डॉक्टर तुषार राठोड यांनी मांडलेला आहे. याला समर्थन दिलेलं आहे आमदार अतुल भोसले यांनी. हे विरोधात आहेत या कोर्सच्या बाबतीत. आता याच्या समर्थनात सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत. त्यांचं समर्थन नेमकं काय आहे ते सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. निर्णयाचे समर्थन आणि विरोध समर्थन करणारे जे काही आहेत डॉक्टर आमदार कुटे म्हणून आहेत. त्यांनी समर्थन केलेलं आहे की बीएचएमएस डॉक्टरांना हा एक वर्षाचा कोर्स केल्यानंतर एलोपॅथीची प्रॅक्टिस करणं योग्य आहे. ग्रामीण भागापर्यंत सुविधा उपचार पोहोचणे हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा अशा प्रकारच्या परमिशन मिळाव्यात यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ते पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आयुर्वेदाला ती प्राचीन जी काही उपचार पद्धती आहे ते मानतात आणि त्याच्यानंतर त्यातूनच या संपूर्ण पॅथींचा जन्म झालाय असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. छत्रपती अकॅडमी पुणे कुठल्याही पॅथीला वरचढ किंवा कुठल्याही पॅथीला कमी किंवा कुठल्याही पॅथीच्या समर्थनात किंवा कुठल्याही पॅथीच्या विरोधात आपण मुद्दे मांडत नाही. जी काही चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. समर्थन आणि फायदे एक ग्रामीण आरोग्य ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठी भडकाती मिळेल. म्हणजेच जे काही अदर पॅथीचे आहेत डॉक्टर्स आहेत मग त्याच्यामध्ये आयुर्वेदा असेल किंवा होमिओपॅथी डॉक्टर असतील यांना थोडीफार सूट दिली तर हे डॉक्टर जे आहेत ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले आहेत. अगदी त्यांचं तालुका प्लेस पासून गाव लेव्हल पर्यंत यांचे क्लिनिक त्या ठिकाणी आहेत. या डॉक्टरांना थोडीशी सूट जर दिली तर त्या ठिकाणी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल. हे समर्थनाचा पॉइंट त्या ठिकाणी आहे प्राथमिक उपचार सर्दी ताप यासारख्या आजारावर तसेच प्राथमिक उपचारासाठी तत्काळ डॉक्टर उपलब्ध होतील. आपातकालीन सेवा आपातकालीन परिस्थितीत तातडीने एलोपॅथी औषध देऊन रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होईल. हे समर्थनात काही आमदारांनी त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. विरोधकांचं म्हणणं काय आहे अपूर्ण ज्ञान आधुनिक वैद्यकशास्त्राच्या अपूर्ण ज्ञानामुळे चुकीची औषध दिली गेल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. शाखांमधील तफावत एलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन पूर्णपणे वेगळ्या आणि भिन्न तत्वावर चालणाऱ्या शाखा आहेत. दुष्परिणाम औषधांचे साईड इफेक्ट हाताळण्याच कौशल्य नसल्यास मोठी हानी होऊ शकते. म्हणजे जे आमदार विरोधात आहेत त्यांनी सांगितलेलं की एमबीबीएस हा क्लिनिकल प्लस सर्जिकल असा साडेपाच वर्षाचा व्यापक कोर्स आहे. बीएचएमएस सुद्धा साडेपाच वर्षाचा आहे परंतु याच्यामध्ये होमिओपॅथी ही विशेषता गोष्ट शिकवली जाते. आणि फक्त एक वर्षाचा फार्माकोलॉजीचा सीसीएमपी कोर्स करून हे डॉक्टर एमबीबीएसच्या समकक्ष होऊ शकत नाहीत. असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि समर्थनामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत की काही जुजबी आजार आहेत ज्याची एसओपी ठरलेली आहे. ताप, सर्दी, खोकला असे काही जुजबी किंवा किरकोळ आजार आपण ज्याला म्हणतो याच्यावर इमर्जन्सी मध्ये हे डॉक्टर एलोपॅथीचा औषध सजेस्ट करू शकतात. त्यांना तशी परवानगी द्यावी असे समर्थनात त्या ठिकाणी मुद्दे आलेले आहेत. धोरणात्मक पैलू काय आहेत आणि पुढील दिशा कशा प्रकारे असणार आहेत ते आपण पाहूयात. सकारात्मक दृष्टिकोन शासनाने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आणि ग्रामीण आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. संयुक्त समिती हा निर्णय घाईघाईने न घेता, 'आरोग्य विभाग' आणि 'वैद्यकीय शिक्षण विभाग' यांची संयुक्त समिती स्थापन करून सविस्तर अभ्यास केला जाईल. अभ्यासक्रमाची आखणी तज्ञांच्या सल्ल्याने फार्माकोलॉजीचा योग्य आणि परिपूर्ण अभ्यासक्रम आखल्यानंतरच पुढील कायदेशीर परवानगीचा विचार होईल. सर्वोच्च प्राधान्य शेवटी शासनाने हे स्पष्ट केले आहे की कोणताही निर्णय घेताना रुग्णांची सुरक्षा आणि आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. सध्या या प्रकरणाचं जे स्टेटस आहे हे जे काही प्रकरण आहे याला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे की बीएचएमएस डॉक्टरांना एक वर्षाचा कोर्स करून एलोपॅथीची परमिशन देऊ नये. असं इंडियन मेडिकल असोसिएशनचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि ते कोर्टामध्ये सुद्धा गेलेले आहेत. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे आणि कोर्टाच्या आदेशावरनच हे काही पोर्टल आहे स्वतंत्र पोर्टल बीएचएमएस डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन जे आहे. सीसीएमपी कोर्स एमएच नाशिकच्या अंतर्गत करणारे जे काही 8000 विद्यार्थी आहेत त्यांनी 30 संस्थांमधून हे कोर्स केलेले आहेत आणि 8000 पैकी 2000 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. त्यावर पुढे काय अपडेट येतील हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही बाजूंनी साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. डिटेल चर्चा विद्यार्थ्यांना पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या चर्चेची संपूर्ण लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असेल तर अशा प्रकारच्या चर्चा होत असतील तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये ठळक विद्यार्थ्यांचं करिअर जे आहे एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक योग्य मार्ग आणि शासनाची जी काही धोरण आहेत ती सुद्धा या अशा चर्चेमधून त्या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी मुद्दे ठरणार आहेत. नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या youtube चॅनलला सबस्क्राईब करा पेड काउंसलिंग साठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. तुरतास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये धन्यवाद.



