Thumbnail for Mahatma Basveshwar History / महात्मा बसवेश्वर जिवन चरित्र by Lingayat - लिंगायत

Mahatma Basveshwar History / महात्मा बसवेश्वर जिवन चरित्र

Lingayat - लिंगायत

15m 2s1,696 words~9 min read
Auto-Generated

[0:00]जय बसव. लोकशाही जनक लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वरांच्या 914 व्या जयंतीनिमित्त खास प्रस्तुती. महात्मा बसवेश्वर जीवन चरित्र. लेखन-निवेदन शरण गणेश वैद्य औरंगाबाद मो. 9595957772 आपल्या भारत देशाला महान अशी संत, महात्मे, थोर समाज सुधारकांची परंपरा लाभलेली आहे. यात प्रामुख्याने सकल मानव जातीला धम्माचा उपदेश देणारे भगवान बुद्ध, अहिंसेचा पुरस्कार करणारे वर्धमान महावीर, गुरु नानक देव, संत रविदास, संत कबीर आणि जगाला जातीभेद वर्णभेद, लिंगभेद जुगारून समता बंधुत्वता स्वीकारून कायक वे कैलास म्हणजेच खरे परिश्रम हेच परमेश्वर आहेत असा महान संदेश देणारे बाराव्या शतकातील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर

[1:09]12 व्या शतकाच्या कालखंडात सगळीकडेच धर्माच्या नावाखाली समाजाचे आर्थिक, सामाजिक, मानसिक शोषण होत होतं. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेदाने मनुष्यच मनुष्याचे शोषण करीत होता आणि अशा भयानक काळोखात एक क्रांतीचा सूर्य उगवला. सन 1105 साली अक्षय तृतीया या दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावी मादरस आणि मादालंबिका यांच्या पोटी महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला. त्या काळात अत्यंत बिकट बनलेल्या परिस्थिती आणि धर्माच्या नावाने होणारं शोषण पाहून बसवांचं मन अत्यंत व्यथित होत असे. आपल्याच घरातील बहिणीला आणि स्वतःला मिळणारी वेगवेगळी वागणूक बघून, तसेच आपल्यातीलच काही लहान मुलांचा क्षुद्र म्हणून होत असलेला छळ पाहून बसवांच्या मनात अनेक प्रश्न पडत असत. आणि अशा वेळेस त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला मोठ्या व्यक्तींनी दिलेली तर्कहीन उत्तरे बसवांना कधीच पटली नाही. वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा बसवांचा उपनयन संस्कार होत होता, तेव्हा त्यांनी हट्ट धरला. माझा उपनयन संस्कार करण्याअगोदर माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या बहिणीचा म्हणजेच अक्का नागाईचा अगोदर हा संस्कार करावा. उपस्थित असलेल्या पंडितांनी स्त्री क्षुद्र असल्याकारणाने सदर संस्कार करण्याचा अधिकार स्त्रियांना नाही, असे उत्तर देतात. महात्मा बसवेश्वर म्हणाले, जर स्त्री क्षुद्र असेल, तर मी तिच्या पोटी जन्म घेणारा कसा उच्च असेल, असे म्हणून स्त्री-पुरुषातील भेद करणारा उपनयन संस्कार बसवेश्वरांनी नाकारला. आपल्या अशा क्रांतिकारक विचारांचा त्रास आपल्या आई-वडिलांना होऊ नये म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग केला. कारण त्याकाळी परिस्थितीच तशी होती, जो पण कर्मकांडाच्या विरोधात आवाज उठवी, त्यांना मूठभर असलेले पण समाजावर देवा-धर्माच्या नावाखाली अधिपत्य गाजवणारे वाईट टाकत असत. समाजाला अशा गुलामगिरीतून मुक्त करण्याकरिता महात्मा बसवेश्वरांनी केलेला हा पहिला महान त्याग होता. गृहत्याग करून बाळ बसवेश्वर तत्कालीन शैव परंपरेचे प्रसिद्ध केंद्र असलेले कुडल संगम येथील ईशान्य मुनींच्या आश्रमात आले. तिथे त्यांनी विद्या अभ्यास केला. धर्मशास्त्राचा अभ्यास करताना धर्मग्रंथातील तत्त्वज्ञान आणि प्रचलित समाजव्यवस्था यातील भयंकर तफावत त्यांच्या लक्षात आल्यानंतर बसवेश्वरांचे चिंतन नव्या दिशेने सुरू झाले. मंदिरात फक्त विशिष्ट लोकांनाच मिळणारा प्रवेश, देवा-धर्माच्या नावाने होणारे समाजाचे आर्थिक शोषण त्यांना नकोसं वाटू लागलं. धर्म, पंथ, जात, वर्ण, वंश आणि लिंग अशा भेदांनी छिन्न-विछिन्न झालेल्या समाजात एकसंध करण्याकरिता समानतेचे प्रतीक असलेल्या इष्टलिंगाचा अविष्कार त्यांनी घडवून आणला. आणि भेद-भीतीला संपून इष्टलिंग धारण करणारी प्रत्येक व्यक्ती लिंगवंत म्हणून संबोधली. तोच आजचा लिंगायत धर्म होय. इष्टलिंगाबाबत महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात, विशाल विश्वापार असीम गगनापार, त्याही पार, तव विस्तारातील विस्तार, श्री चरण तुमचे पाताळ पल्ल्याड, श्री मुकुट तुमचा ब्रम्हांड पल्ल्याड, अगम्य, अगोचर अप्रतिम लिंगप्रभू करस्थळावर माझ्या येऊनीया बिराजला. लहान तुम्ही झालात हो, कुडल संगम देवा. मंदिरातल देव धनीकांचा असतो म्हणूनच त्यांनी प्रत्येकाचा देव प्रत्येकाजवळ दिला. या देवाची पूजा करण्यास कोणाचेही बंधन नाही. वेळेचेही बंधन नाही, कोणताही अवडंबर नाही, कोणताही भेदभाव नाही, कोणतेही सोवळे ओवळे नाही, कोणतेही सुतक नाही. सदन बांधती देवालये, सदन बांधती देवालये, देवा मी गरीब काय करू, देहच माझे देवालय, देवळाचे खांब माझे पाय, मस्तक असे सुवर्ण कलश. स्थावर पावे नाश, चैतन्य असे अविनाश, पहा हो कुडल संगम देवा. याच दरम्यान बसवेश्वरांच्या मामांचं म्हणजेच बिज्जल राजाचे मंत्री असलेले बलदेव यांचा आगमन कुडल संगमला होते. बसेश्वरांची विद्वत्ता पाहून बलदेव मंत्री आपली मुलगी गंगाबिका हिचा विवाह महात्मा बसवेश्वरांशी थाटात लावून देतात. त्यानंतर महात्मा बसवेश्वर मंगळवेडा येथील राजा बिज्वलाकडे कारकून म्हणून रुजू होतात. कामातील प्रामाणिकता सतत चांगले काही करण्याची तळमळ पाहून राजा बिज्वलाकडे राज्याचे प्रधान पदापर्यंत मजल गाठतात. समाजाला अनिष्ट रूढी परंपरा यातून मुक्त करण्याची मनाची इच्छा बसवेश्वरांना स्वस्थ बसू देत नव्हती. बिज्वला राजाची राजधानी कल्याणला आल्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी जगातील पहिली लोकशाहीचा पुरस्कार करणारी संसद प्रणाली म्हणजेच अनुभव मंडप स्थापन केला. या अनुभव मंडपात सर्व भेद बाजूला सारून प्रत्येक व्यक्तीला मुक्त प्रवेश देण्यात आला. महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा असे म्हणू नका हो. हा आमचा, हा आमचा असेच बोला हो. कुडल संगम देवाच्या घरचा पुत्र असती असेच वदा हो. अनुभव मंडपात प्रत्येक व्यक्ती आपापले कायक करून म्हणजेच रोजचे काम करून धर्माबाबत चर्चा करत असत. अल्लाम प्रभूच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या अनुभव मंडपात एकूण 770 सभासद होते. त्यापैकी 70 सभासद या महिला होत्या आणि बरं का या अनुभव मंडपाचं काम आजच्या लोकशाहीच्या संसद कार्यप्रणालीप्रमाणे चालत असत. त्यात सर्व सभासदांना समान अधिकार आणि आपलं मत मांडायचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. महात्मा बसवेश्वरांनी आणि सर्व शरणांनी अनुभवालाच प्रमाण मानले. ज्याप्रमाणे संसदेत चर्चा होऊन कायदे पारित होतात त्याचप्रमाणे अनुभव मंडपात माणसानं कसं वागलं पाहिजे यावर साधक-बाधक चर्चा करून विचार पारित केले जात. आणि हे सर्व विचार तत्कालीन लोक भाषेत म्हणजेच कन्नड भाषेत काव्यबद्ध करण्यात येत असत आणि हेच वचन साहित्य होय. पण वचन म्हणजे नुसता समाजाला दिलेला कोरडा उपदेश नाही, तर आचरणात आणून सांगितलेलं अनुभव आहे. महात्मा बसवेश्वरांनी भिक्षावृत्तीला विरोध केला. प्रत्येक व्यक्तीनं सत्यमार्गाने अंगमेहनत करूनच आपले पोट भरले पाहिजे. मग तो संसारी असो वा संन्यासी असो, कायकच खरा कैलास आहे. परिश्रम हेच खरे परमेश्वर आहे. आपलं काम हीच खरी ईश्वरपूजा आहे. तेव्हा आपण आपलं काम करताना सर्व काही विसरून ते काम सत्यतेनं आणि पूर्ण निष्ठेनं करावं असा महान संदेश त्यांनी दिला. कायकाची महती आपल्या एका वचनातून ते गातात ते म्हणतात, ज्याने भिजवली घामाने ही काळी माती, आयुष्यभर कष्ट उपसले पोटासाठी, अखंड श्रमाने आपुल्या देहास ज्याने राबविले, तन मन श्रमपूर्वक ज्याने झिजवले, तयाने केली खरी इष्टलिंग पूजा, तयाची झोपडी मज कैलासापरी. कथनी करणी असे एक ज्याची तो असे जगतास जगद्गुरुपरी, पहा हो कुडल संगम देवा. भिक्षावृत्तीला कडाडून विरोध करताना महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात, फुटकी खापरी देखील घरी न रावी ऐसे कराव देवा. द्या हो देवा माझ्या हाती गवताची काडी आणि मी जरी शरणू म्हणत भिक्षा मागतल्यास इथून पुढे जा म्हणा हो कुडल संगम देवा अर्थात की माझ्या घरी जरी फुटकं खापर राहिलं आणि माझ्या हातात फक्त खाण्यासाठी गवताची काडी राहिली तरी मी तुमच्याकडे भिक्षा मागायला आलो तरी तुम्ही भिक्षा न देता मला पुढे जा म्हणावं. आणि कायकाचं म्हणजेच परिश्रमाचं महत्व मला सांगावं असं स्वतःविषयीच बसवेश्वर म्हणतात. परिश्रमाचे महत्त्व सर्व शरणांनी मान्य केले आणि परिश्रमालाच खरा कैलास मानले. याबाबत शरण आदय्या आपल्या एक वचनात म्हणतात, असता कायकात मग्न विसरावे असो गुरुदर्शन, लिंगपूजा ही विसरावी, असता जंगम समोर नका घेऊ दखल त्याची. कायकातच खरा कैलास असल्या कारणानं अमलेश्वर लिंगही आहे कायकातच. म्हणजेच शरणांनी देवाला, धर्माला आणि साक्षात ज्ञान देणाऱ्या गुरूपेक्षाही आपल्या परिश्रमाला सर्वोच्च स्थान दिले. त्याचबरोबर सर्व कामे सारखीच आहेत.

[9:16]सर्व कामांचा आपण आदर केला पाहिजे कारण कामाने मनुष्य श्रेष्ठ व कनिष्ठ होऊच शकत नाही. त्याचं श्रेष्ठत्व हे त्याच्या आचरणाशी संबंधित असतं, अशी श्रमाकडे समानतेने बघण्याची दृष्टी महात्मा बसवेश्वरांनी दिली. महात्मा बसवेश्वरांचं हे मानवत्ववादी कार्य पाहून अनेक ठिकाणांहून आणि सर्व जाती-धर्माचे लोक त्यांच्या या कार्यात सामील झाले. त्यात प्रामुख्याने सोलापूरचे सिद्ध रामेश्वर, मडियाळ माचैय्या, अंबिर चौडैय्या, अक्का महादेवी, महाराष्ट्राचे उरीलिंग देव, बहुरूपी चोडैय्या, शरण आदय्या, काश्मीरचा राजा महादेव, अफगाणिस्तानचे मंगलू शंकर देव, विदर्भाचे ढोर ककैया, त्याचबरोबर श्रमाला सर्वश्रेष्ठ मानणारे बुरुड केतय्या यासारख्या असंख्य शरणांची साथ महात्मा बसवेश्वरांना लाभली. या सर्व शरणांच्या मदतीने समाजाला महात्मा बसवेश्वरांनी एक नवीन आदर्श प्रणालीने जीवन जगण्याचा नवा मार्ग दिला. यात प्रामुख्याने देवा-धर्माच्या नावाने चालणाऱ्या सर्व वाईट चालीरीतींना, कर्मकांडांना, महिला पुरुषातील भेदांना नाकारून समाज कायक प्रधान बनवलं. विद्वानच पुनर्वसन, महिलांना सर्व अधिकार, वैश्यांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याकरिता त्यांची लग्ने, स्वर्ग, नरक अशा भ्रामक कल्पनेला विरोध केला. स्वर्ग आणि नरक सर्व भ्रामक कल्पना आहेत याविषयी महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात, स्वर्गलोक, मृत्युलोक असे काही नसे हो. सत्य बोलणेच असे देवलोक हो. असत्य बोलणेच असे मृत्युलोक हो. सदाचारातच असे स्वर्ग हो. अनाचारातच दिसे खरा नरक हो. यास तुम्हीच असे प्रमाण हो कुडल संगम देवा. ज्योतिष्य पाहणे आणि भविष्य पाहणे याविषयी महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात, पोपटाने भविष्य सांगून उपयोग काय, कळेना त्याला त्याचेच मांजर कधी त्याला खाईंल काय? सर्व जग पाहणारे डोळेच डोळे पाहू शकत नाही. दुसऱ्याचे भविष्य सांगणारे ढोंगी कधी स्वतःचेच भविष्य जाणू शकत नाही.

[11:17]पहा हो कुडल संगम देवा. मुहूर्ताविषयी ते म्हणतात, वडीलधारे होय म्हणतील तोच शुभ दिन जाणा हो. लग्न, राशी, कूळ, चंद्रबळ, ताराबळ, गुण संबंध तेव्हाच आहे शुभ जाणा हो. उद्यापेक्षा आजचाच दिन शुभ जाणा हो कुडल संगम देवा. जातिभेदाने त्रस्त झालेल्या समाजाला आणि क्षुद्र आणि अतिशूद्र अशांचा तिरस्कार करणाऱ्यांना महात्मा बसवेश्वर म्हणतात, आकाश एकच वेषी बाहेर आणि वेशीतल्या आतल्यांसाठी. जमीन एकच क्षुद्र आणि शिवालयासाठी. पाणी एकच स्वच्छ आणि आचमनासाठी. कुळ एकच स्वतःला जाणून घेण्यासाठी. सर्व असती एकच तुम्हाला जाणून घेण्यासाठी पहा हो कुडल संगम देवा. महात्मा बसवेश्वर फक्त बोलणारेच नाही, तर कृतीही करणारे होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं त्यांचं आचरण होतं. या दरम्यान जातिभेदांच्या भिंती तोडण्याकरिता ब्राह्मण मादुरस यांची कन्या कलावती व चांभार हरळैय्या यांचा पुत्र शिलवंत याचा विवाह अनुभव मंडपाच्या मार्गदर्शनाने आणि संमतीने लावण्यात आला. जातिभेदांना संपवण्याकरिता उचललेले हे त्याकाळील एक महान क्रांतिकारक पाऊल होते. अशा या क्रांतिकारक विचाराने सर्व समाज ढवळून निघाला आणि त्या काळातील सनातनी कर्मट लोकांच्या पथ्यी ही गोष्ट पडली नाही. त्यांनी राजा बिज्जोलाचे कान भरणे सुरू केले. या घटनेने धर्म बुडाला धर्म बुडाला असा टाहो फोडत मधुरस हरळैय्या यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यास भाग पाडले. महात्मा बसवेश्वरांनी या विरोधात आपल्या प्रधान पदाचा त्याग केला. अशातच राज्यात अराजकता पसरली. यात राजा बिज्वलाचा खून झाला. या घटनेने महात्मा बसवेश्वरांना अति दुःख झाले. मुळातच त्यांना हिंसा नको होती. त्यांना हे कल्याण सोडावं लागलं. शरणांची अशी झालेली वाताहत पाहून त्यांचे मन फार दुखी झाले. अशा या वेदनांनी भरलेल्या मनाने महात्मा बसवेश्वर आपल्या एका वचनात म्हणतात, शरण दृष्टी पडता मना वाटे उल्लास, न दिसता मनाची ध्यान अवस्था पहा. दिवस रात्र परी भासे. रात्र दिवसा परी भासे. आपलीच अवेलना करून काळ कसा कंटवू, एक एक क्षण एक युगास मज वाटे. पहा हो कुडल संगम देवा. शरणांचा विरह सोसण्यापरी मज मरण प्रिय भासे. याच दरम्यान कल्याण प्रति क्रांती झाली. वचन साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. शरणांच्या कत्ली होऊ लागल्या. महात्मा बसवेश्वर कुडल संगम येथे आले आणि अशा भयान परिस्थितीत सन 1167 साली नागपंचमी या दिवशी ते अनंतात विलीन झाले. मानवतेचा सूर्य अस्तला गेला, पण आपल्या विचाराच्या प्रकाशाने सारे जगच दिपून गेले आणि आज आपण त्यांच्या जयंतीच्या शुभदिनी आपण त्यांच्या विचारावर चालून परिश्रमाला सर्वश्रेष्ठ मानून या भारत देशाचं नवीन भविष्य घडवूया.

[14:19]महात्मा बसवेश्वरांचा अनुभव मंडप आणि त्यांचे कार्य कसे होते याविषयी अल्लाम प्रभू आपल्या एका वचनात म्हणतात, कल्याणपूर झाली पणती. पणतीत असे तेलरूपी भक्ती. आचारांची बनली वाती. तिला स्पर्शलिंग बसवज्योती, अनुभव प्रकाश तिचा फाकला. त्यात शरणांचा मेळा भरला, ते स्थळ झाले भक्ति सदन, झाला हो देश परम पावन. या गृहेेश्वर लिंगाची मज आन, झाले हो लिंगी मज बसव दर्शन, झाले हो लिंगी मज बसव दर्शन. अशा महान महात्मा बसवेश्वरांच्या चरणी कोटी कोटी वंदन. सर्व समाज बांधवांना गणेश वैद्य, औरंगाबाद यांच्याकडून बसवमय हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा, शुभेच्छा, शुभेच्छा.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript