[0:00]तुमचं जिल्ह्या परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी तुमचं शिक्षण झालंय. आज जिल्ह्या परिषद शाळेचं शिक्षण घेतलेली विद्यार्थी तू आज बाहेरील देशामध्ये शिक्षण झाली. काय सांगशील तू? सांगशील तू जिल्ह्या परिषद शाळेबद्दल? जिल्ह्या परिषद शाळेने खरं मला शिकवलं, मला घडवलं खरं तर असं काही नाहीये की जिल्हा परिषद शाळेत शिकलं किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकलं म्हणजे दुसऱ्या देशात टिकेल. असं काहीच नाहीये. इंग्लिश मीडियमची मुलं पण माझ्यासोबत होती, सीबीएसईची मुलं माझ्यासोबत होती आणि मी झेडपीची पण होते. पण काही काही सीबीएसईची पण मागं पडत होती. पण झेडपीची मुलं कधीच मागं नाहीत पडणार कारण त्यांना फक्त अभ्यासाच नाही शिकवल जात. बाकीचे त्यांना खेळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना बाकीच पण खूप सारं ज्ञान दिलं जातं जिल्हा परिषद शाळेमध्ये. तेच मी जे स्ट्रॉंग झाले ते सगळं जिल्हा परिषद शाळेमुळेच झाले. अ आत्तापर्यंत मी जिल्हा परिषद शाळेत होते. खूप मुलांना वाटायचं की मी जिल्हा परिषदची आहे, पुढे टिकेल की नाही किंवा माझं इंग्लिश एवढं स्ट्रॉंग नाहीये जसं की सीबीएसईवाल्या मुलांचं वगैरे असतं. पण तरी पण ठीक आहे मी तिथे चालू शकले, मी जेवढं पाहिजे तेवढं इंग्लिश बोलत होते त्या लोकांशी. चार वर्ष तिथे मी सरवाइव करू शकले. त्याच्यानंतर असं कितीतरी मुलं आपल्या समोर एक्झाम्पल आहे की मुलं आयएस झालेत, आयपीएस झालेत, सायंटिस्ट झालेत, हे झेडपी मधून पण होतात. त्यामुळे आत्ताच थोडसं आहे की माझी मुलगी मुलगा इंग्लिश मीडियममधून शिकला पाहिजे पण असं नाहीये. झेडपीचे शिक्षक पण खूप चांगले आहेत, खूप सपोर्ट करतात. प्रत्येक गोष्ट मला जो कॉन्फिडन्स आत्तापर्यंत मिळत गेलाय तो सगळ्या शिक्षकांमुळेच मिळत गेलाय कारण त्यांनी जे माझं कौतुक केलंय त्यातून मला एक प्रेरणा मिळाली आहे किंवा मला कॉन्फिडन्स वाटत गेलाय की हा सर माझं कौतुक करतात मॅडम माझं कौतुक करतात मला काहीतरी करून दाखवायचंय. यातूनच मी इथपर्यंत पोहोचले.

परदेशात शिक्षण घेऊनही मातीशी नाळ जपणारी ऋतुजा काकडे; ZP शाळांबद्दल व्यक्त केले अभिमानास्पद विचार
Deshsatta News Reporter
1m 41s275 words~2 min read
YouTube auto captions
Transcript source
YouTube auto captions
This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.
Pull quotes
[0:00]आज जिल्ह्या परिषद शाळेचं शिक्षण घेतलेली विद्यार्थी तू आज बाहेरील देशामध्ये शिक्षण झाली.
[0:00]जिल्ह्या परिषद शाळेने खरं मला शिकवलं, मला घडवलं खरं तर असं काही नाहीये की जिल्हा परिषद शाळेत शिकलं किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिकलं म्हणजे दुसऱ्या देशात टिकेल.
[0:00]इंग्लिश मीडियमची मुलं पण माझ्यासोबत होती, सीबीएसईची मुलं माझ्यासोबत होती आणि मी झेडपीची पण होते.
[0:00]पण झेडपीची मुलं कधीच मागं नाहीत पडणार कारण त्यांना फक्त अभ्यासाच नाही शिकवल जात.
Use this transcript
Related transcript hubs
Watch on YouTube
Share
MORE TRANSCRIPTS


