[0:00]गोष्टीचे नाव आहे मुंगी आणि कबुतर. उन्हाळ्याचे दिवस होते. एका मुंगीला खूप तहान लागली होती. ती पाण्याच्या शोधात नदीकडे आली. पाणी पिता-पिता तिचा पाय घसरला. ती पाण्यात पडली आणि गटांगळ्या खाऊ लागली. ती खूप घाबरली व जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज झाडावर बसलेल्या कबुतराने ऐकला व तिला मदत करण्यासाठी कबुतराने पटकन झाडाचे पान तोडले आणि मुंगी जवळ टाकले. हळूहळू मुंगी त्या पानावर चढली आणि तरंगत-तरंगत काठावर पोहोचली. कबुतराने आपला जीव वाचवला म्हणून मुंगीने त्याचे आभार मानले. असे बरेच दिवस निघून जातात. एके दिवशी दुपारच्या वेळी एक शिकारी त्या जंगलात आला. त्याने झाडावर बसलेल्या कबुतराला पाहिले, लगेच शिकाऱ्याने नेम धरला आणि कबुतराची शिकार करण्याचे ठरवले. हा सगळा प्रकार जवळच असलेल्या त्या मुंगीच्या लक्षात आला आणि आपला मित्र संकटात असल्याचे तिच्या लक्षात आले. ती क्षणाचाही विलंब न करता पुढे सरसावली व शिकाऱ्याच्या पायाला कडकडून चावली. ओय ओय शिकारी किंचाळला. आणि त्याचा नेम चुकला. तेवढ्यात कबुतर तेथून उडून गेले. अशाप्रकारे मुंगीने कबुतराचा जीव वाचवला. तात्पर्य आपण केलेली मदत कधीच वाया जात नाही. धन्यवाद.

Mungi Ani Kabutar | मुंगी आणि कबुतर | Marathi Story | मराठी कथा | Marathi Goshti | Umesh Khirade
Umesh Khirade
1m 36s162 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source
YouTube auto captions
This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.
Pull quotes
[0:00]तिचा आवाज झाडावर बसलेल्या कबुतराने ऐकला व तिला मदत करण्यासाठी कबुतराने पटकन झाडाचे पान तोडले आणि मुंगी जवळ टाकले.
[0:00]त्याने झाडावर बसलेल्या कबुतराला पाहिले, लगेच शिकाऱ्याने नेम धरला आणि कबुतराची शिकार करण्याचे ठरवले.
[0:00]हा सगळा प्रकार जवळच असलेल्या त्या मुंगीच्या लक्षात आला आणि आपला मित्र संकटात असल्याचे तिच्या लक्षात आले.
Use this transcript
Related transcript hubs
Watch on YouTube
Share
MORE TRANSCRIPTS


