Thumbnail for Mahatma Basveshwar History / महात्मा बसवेश्वर जिवन चरित्र l संत बसवेश्वर यांची संपूर्ण माहिती कथा l by माझी सखी सोबती

Mahatma Basveshwar History / महात्मा बसवेश्वर जिवन चरित्र l संत बसवेश्वर यांची संपूर्ण माहिती कथा l

माझी सखी सोबती

11m 7s995 words~5 min read
Auto-Generated

[0:01]वेदांवर वार करेल, शास्त्राला बेड्या ठोकेल, सरकारंच्या पाठीवर आसूड ओढेन. अगो माझे नाक कापेन, मी मातंग चन्नैयाच्या घरचा पुत्र आहे. पहा देवा, महाज्ञानी कुडल संगमा. नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खूप स्वागत आहे. आज आपण महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. महात्मा बसवेश्वर हे यांना महात्मा ही पदवी का मिळाली किंवा यांचा संपूर्ण जीवनप्रवास कशा पद्धतीने होता याची माहिती आपण घेणार आहोत. महात्मा बसवेश्वर यांनी जातीव्यवस्था आणि हिंदू धर्मातील इतर वाईट गोष्टी विरुद्ध संघर्ष केला. म्हणून त्यांना महात्मा, संत बसवेश्वर यांचा जन्म 1131 मध्ये वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया या दिवशी बागेवाडी कर्नाटकच्या संयुक्त विजापूर जिल्ह्यात स्थित बागेवाडी या गावांमध्ये वीर शैव प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. संत बसवेश्वर यांनी 1800 वर्षांपूर्वी महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी लढा दिला होता. त्या काळात ऊच आणि नीच भेदभाव हा खूप होता. ही सामाजिक फाळणी नष्ट करण्यासाठी संताने जातिवादाच्या विरोधात लढा दिला होता. तर महिलांवरील अत्याचार संपवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. दुष्कृत्य दूर करण्यासाठी त्यांनी लिंगायत नावाचा नवा पंथ स्थापन केला. तेव्हापासूनच लिंगायत पंथाची स्थापना झाली असं म्हटलं जातं. संत बसवेश्वर भगवान शंकराच्या निराकार शिवलिंगाची पूजा करत होते. म्हणूनच सुरुवातीला शैव धर्माशी संबंधित मानले गेले. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्यांचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. महात्मा बसवाननांनी समाजव्यवस्था परिवर्तन करण्यामध्ये खूप मोठे योगदान दिले. मठ आणि मंदिरांमधील वाईट प्रथा, अंधश्रद्धा श्रीमंतांच्या शक्तीला त्यांनी आवाहन दिले. त्यांना विश्वगुरु, भक्ती भंडारी आणि बसवन्ना म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी लिंग, जात, सामाजिक स्थिती या गोष्टीचा विचार न करता सर्व लोकांना समान संधी देण्याचे सांगितले होते. बसवेश्वर हे स्वतः ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. त्यांनी ब्राह्मणाच्या वर्चस्ववादी व्यवस्थेला विरोध केला. जन्माधारित व्यवस्थेऐवजी कर्मावर आधारित व्यवस्थेवर त्यांचा अधिक विश्वास होता. दुष्कृत्य दूर करण्यासाठी त्यांनी त्या नव्या संप्रदायाची स्थापना केली त्याला लिंगायत असे नाव देण्यात आले. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या जवळपासच्या राज्यामध्येही खूप मोठ्या प्रमाणात लिंगायत लोकसंख्या आहेत. लिंगायत पंथांचे लोक ना वेद मानतात, ना मूर्ती पूजेवर विश्वास ठेवतात. लिंगायत हिंदू भगवान शिवाची पूजा करत नाहीत परंतु योग्य आकाराच्या इष्टलिंग या रूपात देवाची पूजा करतात. लिंगायतांची पुनर्जन्मावर विश्वास नाही. लिंगायतांची अशी श्रद्धा आहे की जीवन हे एकच आहे. आणि ते आपल्या कृतीने आपले जीवन स्वर्ग किंवा नरक बनवू शकतो. बसवेश्वर गेल्यानंतर या पंथाने प्रथम हिंदू वैदिक धर्माचे पालन करण्यास सुरुवात केली.

[4:16]नंतर त्यांच्या अनुयायांनी स्वतःला शिवलिंगाच्या पूजेपासून वेगळे केले आणि इष्टलिंगाला पूजेचा आधार बनविला. कर्नाटकात हिंदूचे प्रामुख्याने पाच पंथ आहेत. त्यांचा अनुक्रमे शैव, वैष्णव, शाक्त, वैदिक आणि स्मार्त अशी पाच नावे आहेत. यामध्ये शैव पंथाचे अनेक उपपंथ आहेत, त्यापैकी एक वीरशैव संप्रदाय आहे. लिंगायत हे एकेकाळी या वीरशैव पंथांचा भाग होते. पण आता त्यांनी स्वतःला पंथ म्हणून घोषित केले आहे. जेव्हा वासुगुप्ताने नवव्या शतकाच्या उत्तरार्ध काश्मिरी शैव धर्माचा पाया घातला. या आधी बौद्ध, नाथ संप्रदायाचे अनेक मठ होते. वासुगुप्ताचे दोन शिष्य कल्लट आणि सोमानंद हे होते. या दोघांनी शैव दर्शनाचा पाया घातला.

[5:15]त्यांचे अनुयायी कमी आहेत. वामन पुराणात शैव पंथाची संख्या चार सांगितली आहेत. ज्यांना पाशुपत, कल्पालिका, कलामुख आणि लिंगायत या नावाने ओळखले जाते. बसवन्नांना कर्नाटकात बसवेश्वरा असेही म्हटले जाते. बसव हे जन्माने ब्राह्मण होते परंतु त्यांनी हिंदू धर्मातील जातिवाद कर्मकांडाच्या विरोधात लढा दिला. तथापि सध्या लिंगायतामध्ये 99 जाती आहेत त्यापैकी निम्म्याहून अधिक जाती दलित किंवा मागास जातीतील आहेत. पण लिंगायत समाजाची गणना कर्नाटकातील पुढारलेल्या जातीमध्ये केली जाते. कर्नाटक मध्ये लिंगायतांची संख्या ही 18% आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश या जवळपासच्या राज्यातही लिंगायतांची लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. 12 व्या शतकात समाज सुधारक बसवन्ना ज्यांना साक्षात भगवान बसवेश्वर म्हणून ओळखले जाते, त्यांनी हिंदू जाती व्यवस्थेतील दडपशाही विरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले. लिंगायत आपल्या अंगावर अष्टलिंग किंवा इष्टलिंग शिवलिंग धारण करतात. पूर्वीचे लिंगायत हे निराकार शिवाचे लिंग मानत. पण कालांतराने त्याची व्याख्या बदलत गेली. आता ते त्यांना इष्टलिंग म्हणतात आणि ते आंतरिक चेतनेचे प्रतीक मानतात. बसवेश्वर यांची नेमकी शिकवण काय होती, तर दानधर्मापेक्षा दासोह महत्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचन साहित्य वाचा, ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा, स्वतःतील दोष दूर करा, कर्मकांड दूर करा, स्वतःची स्तुती करू नका.

[7:20]अशी सहज, साधी आणि सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण भगवान बसवेश्वरांनी दिली म्हणूनस त्यांची जयंती आजपर्यंत प्रत्येक अक्षय तृतीयेला केली जाते. प्रत्येक अक्षय तृतीयेला भगवान बसवेश्वर यांची जयंती खूप उत्साहामध्ये पाळणा घालून गावोगावी ठीक ठिकाणी रॅली काढून किंवा अनेक कार्यक्रम नियोजन करून आजपर्यंत संपूर्ण समाजामध्ये ही केली जाते. तर बसवन्नांनी नेमकं संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त लोकांच्या कल्याणासाठी कार्य केलं. स्वतःचं घर वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सोडून त्यांनी संपूर्ण समाजातील जी उच्च नीचता होती, भेदभाव होता, तो नष्ट करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेठीस दिलं. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त लोक कल्याणाचं कार्य झालं. त्यामुळेच त्यांना आपण साक्षात भगवान बसवेश्वर म्हणून पूजतो. बसवेश्वरांनी स्वतःचा उपनयन संस्कार करून घ्यायचे नाकारले होते. यावरून बालपणापासून त्यांच्या भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये. तीर्थयात्रेला जाण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते.

[8:46]लिंगायत लोक बसवेश्वराला शिववाहन नंदीचा अवतार मानतात. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकठिकाणी मठाची स्थापण केले, योग्य व्यक्तीची नियुक्ती केली. काश्मीर पासून केरळपर्यंतच्या राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्य त्यांच्या अनुयायांचे एक मोहोळच त्यांच्या भोवती जमले होते. यावरूनच त्यांच्या समर्थ संघटन शक्तीची कल्पना आपणा सर्वांनाच येऊ शकते. महात्मा बसवेश्वरांनी कुडलसंगम या प्राचीन शिवाच्या मंदिरामध्ये 12 वर्ष वास्तव्य करून तप केले होते. कुडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. बसव हे निस्सीम शिवभक्त होते. त्यांनी गुरु कडून बसवरायांची दीक्षा घेतली आणि शिवाचे प्रतीक म्हणून इष्टलिंग गळ्यात धारण केले. बसवेश्वरांनी वेद, उपनिषदे, षडदर्शने, पुराणाचा सखोल अभ्यास करून उच्च कोटीचे ज्ञान प्राप्त केले होते. संस्कृत, पाली, तामिळ या भाषांवरती सुद्धा त्यांचं प्रभुत्व होतं. धर्म ग्रंथाचे अध्ययन करून त्यावर चिंतन मनन केले आणि धनुर्विद्या व अन्य कला ते पारंगत होते. बसवेश्वरांनी शरण चळवळीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुकले. चळवळीत सामील झालेल्या पुरुषांना शरण तर महिलांना शरणी असे नाव देण्यात आले. चळवळीत लिंगायत धर्माच्या पुनर्जीवनात लक्षणीय योगदान दिले. चळवळीचे मुख्य वैशिष्ट्ये समानता, समता, बंधुता, विवेक, कायक, दासोह ही ठरली होती. महात्मा बसवेश्वराच्या प्रेरणेतून निर्माण झालेले वचन साहित्य हा एक प्रमुख साहित्याचा प्रकार ठरला. बसवेश्वराची वचने सर्व जीवनस्पर्शी, सर्व जीवनव्यापी व सर्व जीवन प्रभावी आहेत. वचन साहित्यातून महात्मा बसवेश्वरांनी संपूर्ण जनतेला मोलाचा संदेश दिलेला आहे. ही संपूर्ण बसवेश्वराची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript