Thumbnail for किरण कोरे - म. बसवण्णा जयंती, बाजीराव रोड, पुणे.  18/4/18 महात्मा बसवेश्वर जयंती by Lingayat Dharma

किरण कोरे - म. बसवण्णा जयंती, बाजीराव रोड, पुणे. 18/4/18 महात्मा बसवेश्वर जयंती

Lingayat Dharma

11m 21s1,628 words~9 min read
Auto-Generated

[0:00]सर्वांना शरणू शरणार्थी लिंगायत धर्म या YouTube चॅनलचे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी बाजूचा आणि त्याच्यासाठी आपण एकत्र जमला पाहिजे असा काहीतरी कार्यक्रम केला पाहिजे ही इच्छा या मेट्रो सिटीतल्या माणसांच्या मनामध्ये निर्माण होणं हीच खऱ्या महात्मा बसवण्णांच्या विचारांची पावती आहे आपल्याला म्हणता येईल त्यांनी 900 वर्षांपूर्वी काय नाही केलं आमच्यासाठी मला फार मोठा प्रश्न पडतो अशा मोठ्या महापुरुषांकडे बघितल्याच्या नंतर काय कमी होतं त्यांना आयुष्यामध्ये काय गरज होती हे सगळं करण्याची कल्याणच्या दरबारामध्ये महात्मा बसवेश्वर हे पंतप्रधान होते आज जसा आपल्या भारताचे मोदी आहेत की नाही पंतप्रधान त्या पद्धतीने कल्याणच्या दरबारामध्ये एक पंतप्रधान असलेला माणूस त्याला का वाटलं असं आपण समाजासाठी करावं आपण एक दिवस एक सेकंद देऊ शकत नाही समाजासाठी परंतु त्या माणसाने अख्खी हयात दिली मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला विचारत असतो आमच्या आजोबाच्या पणजोबाचा नाव आम्हाला माहिती नसतं आजोबाचं माहिती असतं पणजोबाचं माहिती नसतं आम्हाला पणजोबाच्या बापाचं तर आम्हाला संबंधच नसतो त्याच तर आम्हाला नाव माहिती नाही काहीच माहिती नाही आमच्या रक्तातला आमच्या नात्यातला आमच्या पूर्वज त्याचं नाव आम्हाला माहिती नाही परंतु 900 वर्षांपूर्वी झालेल्या महात्मा बसवेश्वरांच नाव एवढा आमच्या मनामध्ये का भरलय अगदी त्यांचं नाव घेतल्या घेतल्या आमच्या अंगातनं रक्त सळसळा का वहायला लागतं मित्रांनो जी माणसं स्वतःसाठी जगत असतात ती कायमची मरतात परंतु जी माणसं समाजासाठी जगत असतात ती मरूनही जगत राहतात याचे एक उदाहरण आहे म्हणून आज आम्ही एवढ्या धकाधकीच्या आयुष्यात सुद्धा एकत्र जमतो आणि एकत्र जमून महात्मा बसवराज यांची जयंती साजरी करत आहोत त्या राजाने या जगाला लोकशाहीची देणगी दिली मी इथे आल्या आल्या बघितलं खरं तर आपण हे सगळं पूजा वगैरे केलेल नाही ही आमची भावना आहे श्रद्धा आहे परंतु महात्मा बसवेश्वरांनी ह्या सगळ्या प्रकाराला विरोध केलेला आहे तुम्हाला मला प्रामुख्याने सांगायचं आहे महात्मा बसवण्णांनी आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व जर कोणत्या गोष्टीला दिलं असेल तर ते कामाला दिलं आहे कायकाला दिलंय आणि ही सगळी माणसं आपण कुणीच फुकटा मध्ये खात नाही कोणतरी आहे का फुकटा मध्ये खाणार आपण आपण रोज काम करतो कष्ट करतो आणि कष्ट करून कमावलेली भाकरी आपण आपल्या पोटात घालतो महात्मा बसवेश्वरांना त्या काळामध्ये हेच अपेक्षित होतं महात्मा बसवेश्वरांचा सगळ्यात मोठा विरोध जर कोणाला असेल तर तो फुकट खाणाऱ्याला होता फुकट्यात कधी कुणी खायचं नाही असं महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं होतं त्यांनी आम्हाला ओम नमः शिवाय चा मंत्र दिला नाही ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् हा कोणताही मंत्र महात्मा बसवेश्वरानी आम्हाला दिलेला नाही महात्मा बसवेश्वरांनी एकच मंत्र आम्हाला दिला आणि तो मंत्र होता काय कवे कैलास श्रम हा स्वर्ग आहे भावा तुला देव मिळवायचा असेल तर तुला काम करावं लागेल तुझ्या कामामध्ये खरा देव आहे आणि तुला देव मिळेल ही ही सगळी विचारधारा महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये रुजवली होती त्यांचे एक शेवटचे दोन प्रसंग सांगून मी संपवणार आहे खरं तर मला आज संध्याकाळची गाडी आहे 10 वाजताची आणि आणखी जेवण राहिलंय आणि उद्या चाकूरला व्याख्यान आहे लातूर जिल्ह्यामध्ये त्यामुळे जाणं अगदी गरजेचं आहे महात्मा बसवण्णा आपण पूजा वगैरे करतो महात्मा बसवण्णा पूजेची व्याख्या सांगताना म्हणतात आपण गळ्यामध्ये लिंग घालत असाल नसाल काही माणसं घालत असतात किंवा तो तो भाग वेगळा आहे परंतु बसवण्णा म्हणतात तुम्ही काम करत असताना कष्ट करत असताना तुमच्या घामाने तुमच्या गळ्यातला इष्टलिंग ज्यावेळी भिजतो या जगातली सगळ्यात मोठी महापूजा आहे असं बसवेश्वरांनी आम्हाला सांगितलंय आम्हाला पूजा करण्यासाठी कुठल्या फुलाची गरज नाही कुठल्या फळाची गरज नाही कुठल्या कुंकाची गरज नाही कशाचीच गरज नाही आम्हाला पूजा करायची असेल तर आम्हाला कष्ट करताना जो आमचा हा गळ्यातला इष्टलिंग ज्यावेळी आपला भिजतो की या जगातली सगळ्यात मोठी महापूजा हे बसवेश्वरांनी आम्हाला सांगितलंय याच्या पुढे जाऊन ते आम्हा म्हणतात काम करून कष्ट करून कमावलेली तुमच्या पोळी डब्यातली तुमच्या दुर्बी मधली अर्धी भाकर समाजातला सगळ्यांना तो महाप्रसाद आहे स्वामींनी आम्हाला एक साधा सोप्पं तत्वज्ञान बसवेश्वरांनी आम्हाला त्या काळामध्ये दिलं आज अगदी जगामध्ये महात्मा बसवण्णा स्वीकारले आहेत परवा लंडनमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं मॉरिशसमध्ये महात्मा बसवण्णा अनुभव मंडप चालतो दिल्लीमध्ये संसदेच्या समोर महात्मा बसवण्णा यांचा पुतळा आहे पण आम्ही सगळे चोर निघालो आम्हालाच माहित नाहीत महात्मा बसवण्णा आम्ही डोक्यावर घेऊन महात्मा बसवण्णा नासायला लागलो उलट कर्नाटकातली परिस्थिती थोडी बरी वाटते मला कारण तिकडे महात्मा बसवण्णाचं वचन साहित्य कन्नडमध्ये आमच्या मराठी लोकांची तर फार मोठी अपेक्षा आहे कारण आम्हाला वचन साहित्य अगदी आत्ता मराठी मध्ये ट्रान्सलेट झालं आणि आम्हाला मिळालं आम्ही वाचला आणि लोकांसमोर सांगण्याचा प्रयत्न करतोय का बोलवल तुम्ही 20 22 23 वर्षाच्या माझं वय वर्ष फक्त 23 आहे 23 वर्षाच्या किरणला लातूरवरनं महात्मा बसवण्णा सांगण्यासाठी पुण्यामध्ये बोलवल जातं खरं तर पुण्यातही व्यक्ती भारतभर फिरत असतात परंतु लातूर मधला मराठवाड्यातला पोरगा पुण्यामध्ये येऊन महात्मा बसवण्णा सांगतो मित्रांनो ही माझी कमाल नाही किंवा माझं असं याच्यामध्ये काही नाही नुसता महात्मा बसवण्णा वाचला लोकांना सांगितला तर एवढा मोठा मान सन्मान मिळतो एखाद्या पोरांना जर महात्मा बसवण्णाचे नुसते कपडे घालून आला ना तर त्याला आपण स्टेजवर बसवतो लगेच त्याला खाली बसवत नाही

[4:50]म्हणजे नुसते महात्मा बसवण्णा वाचले ऐकले लोकांना सांगितले तर एवढा मान मिळतो नुसत्या महात्मा बसवण्णाची वेशभूषा आपल्या अंगात घातली तर एवढा मान मिळतो मग मला तुम्हा सगळ्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे

[5:18]महात्मा बसवण्णा वाचले ऐकले लोकांना सांगितले अंगात घातले तर एवढा सन्मान होतो महात्मा बसवण्णा चा एक विचार जर आम्ही आचरणात आणला तर आमचं काय नाही होणार आयुष्यामध्ये परंतु आम्ही विचार डोक्यात घेत नाही आम्ही फक्त मूर्तीमध्ये अडकलो आम्ही फक्त प्रतिमेमध्ये अडकलो आम्ही फक्त त्या फोटोमध्ये अडकलो आम्हाला फोटोच फार मोठे आहेत आमच्यासाठी आमच्यासाठी विचार मोठे नाहीत महात्मा बसवण्णा फार सुंदर दिसत होते म्हणून आपण त्यांची पूजा करत नाही का करता तुम्ही फार सुंदर दिसता म्हणून पूजा करता का महात्मा बसवण्णा यांनी केलेलं काम फार सुंदर आहे अगदी हजारो लाखो वर्ष टिकणार काम आहे म्हणून महात्मा बसवण्णाची पूजा केली जाते म्हणून महात्मा बसवण्णा आज आपण जयंती साजरी करतो महात्मा बसवण्णाचे विचार फार चांगले आहेत म्हणून आपण हे सगळं करत असतो म्हणून ज्या गोष्टीसाठी त्या माणसाला पुजलं जातं ती गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे महात्मा बसवण्णाचे विचार अनुभव मंडप असेल अंधश्रद्धा निर्मूलन असेल अंधश्रद्धेवर तर महात्मा बसवण्णाने प्रचंड मोठं काम केलेलं आहे आम्ही जप करतो जप करतो की नाही महात्मा बसवण्णा एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात की जप करून करून फार काय तर भक्त म्हटलं जाईल तुम्हाला आणि फारच केलं तर महाभक्त म्हटलं जाईल परंतु कोणी तुम्हाला भाकरी देणार नाही त्यासाठी तुम्हाला कामच करावं लागेल तुम्ही या जमिनीला जड व्हाल त्यासाठी तुम्हाला कामच करावं लागेल कष्टच करावं लागेल आणि तुम्ही जर कष्ट केलं तर तो कुडल संगमदेव तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही या जगातला सगळ्यात मोठा मंत्र खरं तर हा अर्थशास्त्र अर्थशास्त्र सांगितले जातं त्या अर्थशास्त्रामध्ये मूलभूत गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे काम केलं पाहिजे प्रत्येक माणसाने कष्ट केलं पाहिजे या अर्थशास्त्राची मूलभूत गोष्ट महात्मा बसवण्णाने त्या काळामध्ये कल्याणच्या परिसरामध्ये सांगितली होती आम्हाला 900 वर्षांपूर्वी महात्मा बसवण्णाने जाती निर्मूलनाचा लढा दिला हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा असे म्हणवी देवा हा आमचा हा आमचा असेची म्हणवे कुडल संगमदेवा अरे बाबा कशाला म्हणतोयस हा माळाचा हा कोळाचा हा ब्राह्मणाचा हा मराठ्याचा आहे हा मारवाड्याचा आहे हा कोणाचा आहे हा कोणाचा आहे म्हणून नको हा माझा आहे मन हा आपला आहे मन प्रत्येकाला कवटाळून ठेव अशी विश्वबंधुत्वाची हा माझ्या महात्मा बसवेश्वरांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जाहीरनामा होता सर्वास पोटास लावणी ऐसे करणे परंतु महात्मा बसवण्णा यांचाही एक जाहीरनामा होता माझ्या कल्याण राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं कल्याण झालं पाहिजे हा जाहीरनामा त्या काळामध्ये मांडला आणि पंतप्रधान पदावर असताना अशी अनेक काम महात्मा बसवण्णांनी त्या काळामध्ये केलेली आहेत अगदी त्या काळामध्ये तलावाचं पाणी पिण्याचा अधिकार सगळ्यांना नव्हता आज जो जीआर असतो की नाही तसा जीआर पंतप्रधान असताना बसवेश्वरानी सुद्धा त्या काळात काढला होता की त्या त्रिपुरांतक नावाच कल्याण मध्ये तलाव आहे त्या तलावाचं पाणी प्रत्येक जातीतला माणूस पिऊ शकतो असा जीआर त्या काळामध्ये महात्मा बसवण्णाने काढला होता एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या जातीच्या लोकांना चालण्यासाठी वेगवेगळी रस्ते होती महात्मा बसवेश्वरांनी पुन्हा दुसरा जीआर काढला की माझ्या राज्यांमध्ये कोणत्याही रस्त्यावरून कोणत्याही जातीचा मारुस चालू शकतो जाऊ शकतो माणसाला खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा महात्मा बसवण्णाने त्या काळामध्ये दिली त्या अनुभव मंडपामध्ये 770 लोक होती मरून शंकरदेव नावाचा अफगाणिस्तानहून एक शरण आला होता बघा आज सुद्धा आम्हाला पाकिस्तान अफगाणिस्तान म्हटलं की काहीतरी वेगळं वाटतं कल्याणच्या परिसरामध्ये त्या काळामध्ये त्या काळात मोबाईल नव्हता पत्र नव्हतं काही नव्हतं अशा काळामध्ये त्या अफगाणिस्तानहून मरु शंकरदेव नावाच्या शरण अनुभव मंडपात आणते काश्मीरचे मुळगे मारया नावाचा काश्मीरचा राजा त्या अम अनुभव मंडपामध्ये आला होता आणि राजा सुद्धा अनुभव मंडपामध्ये आल्याच्या नंतर बसवण्णांनी त्याला ठणकावून सांगितलं तू राजा आहेस म्हणून इथे तुला फुकटात खाता येणार नाही तुला इथे काम करावं लागेल कष्ट करावं लागेल आणि काम कष्ट केल्याच्या नंतरच तुला हे सगळं मिळेल मित्रांनो ही सगळी महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्माच्या माध्यमातून हे सगळं तत्वज्ञान त्या काळामध्ये लोकांना दिलं तुम्ही आम्ही सुद्धा ह्या विचाराचे पाइक बनूयात महात्मा बसवण्णाच्या नुसत्या फोटोचे पाइक न बनता त्या विचाराचे पाइक आपण बनूयात कोणताही महापुरुष डोक्यावर घेऊन नाचण्यासाठी नसतो तर महापुरुष हा डोक्यामध्ये घेण्यासाठी असतो आम्ही महापुरुषाला डोक्यामध्ये घेऊयात एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या उत्सुकतेने ऐकत आहात परंतु माझेही नाईलाज आहे पुढे जाणं गाडीचं तिकीट कन्फर्म आहे गेल्याशिवाय उद्याचा कार्यक्रम होणार नाही आता फार धकधक होईल काल सोलापूर मध्ये होतो आणि आज इथं तुमच्या मध्ये आलेलो आहे आपण सगळेजण अगदी शांतपणे मला वाटत होतं आल्या आल्या इथे माणसं बसले नाहीत पुढं काही नाही कसं बोलावं की काय करावं की ऐकते का नाही परंतु अगदी बघा त्या त्या त्या विचारामध्ये त्या बसवण्णांच्या शब्दामध्ये ताकत आहे कारण नुसतं नाव काढल्या खाली ही सगळी माणसं इथे खाली येऊन बसली रस्त्यावरची माणसं सुद्धा ऐकत आहेत हा सगळा विचार तुम्ही उत्सुकतेने ऐकत आहात पुन्हा कधी असा प्रसंग घडला तर अगदी निवांतपणे आपल्याशी हितगुस साधता येईल आपल्याशी संवाद साधता येईल आणि बसवण्णांना मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर सांगता येईल तुम्ही सर्वजण ऐकलात आमचा इथं आल्यानंतर सन्मान केलात आणि मुळे सरांनी तिथून खरं तर सगळ्या ट्रॅफिक मधनं तुमचा कार्यक्रम संकल्प म्हणून कशी कशी गाडी काढली मला भीती वाटत होती आपण कार्यक्रमाला जातो की आता हॉस्पिटलमध्ये जातो ही शंका माझ्या मनामध्ये होती परंतु अगदी व्यवस्थित रित्या ते इथे घेऊन तुमच्यासाठी मला इथे आणलं आणि आपण सर्वजण एकमेकाशी संवाद साधला त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो असा मेट्रो सिटी मध्ये सुद्धा तुम्ही आपले विचार जपलात त्याबद्दल तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो असंच कार्य करत रहा एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript