Thumbnail for उकडीचे मोदकसाठी लागणार पीठ | How To Make Perfect Flour For Ukdiche Modak |  Aruna jamdare by Aruna Jamdare Recipe

उकडीचे मोदकसाठी लागणार पीठ | How To Make Perfect Flour For Ukdiche Modak | Aruna jamdare

Aruna Jamdare Recipe

5m 2s693 words~4 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Timestamped outline
[0:00]Section 1

गौरी गणपती जवळ येत आहेत आणि गणपतीत सगळ्यात जास्त महत्त्वाचा मेनू म्हणजे उकडीचे मोदक जे गणपती बाप्पाला आणि सर्वांनाच खूप खूप खूप आवडतात.

[1:06]Section 2

हा आहे आंबेमोहर तांदूळ ह्याच्याने मोदक छान मऊ आणि पांढरे शुभ्र होतात.

[2:04]Section 3

आता ह्याचा प्रमाण कसं घ्यायचं. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे.

[2:46]Section 4

साधारण अर्धा तास चाळणीत तांदूळ व्यवस्थित निथळल्यानंतर एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ पसरवून घ्यायचे.

[3:41]Section 5

साबुदाणा घालताना तो प्रमाणातच घाला.

[4:33]Section 6

चला तर मग लगेच तयारीला लागा, लगेच जाऊन तांदूळ घेऊन या, स्वच्छ धुऊन सुकवून पीठ तयार करा आणि ह्या गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाला अस...

Pull quotes
[0:00]गौरी गणपती जवळ येत आहेत आणि गणपतीत सगळ्यात जास्त महत्त्वाचा मेनू म्हणजे उकडीचे मोदक जे गणपती बाप्पाला आणि सर्वांनाच खूप खूप खूप आवडतात.
[0:09]तर हेच उकडीचे मोदक मऊ लुसलुशीत छान कळीदार आणि सुगंधी होण्यासाठी बाजारात तयार मोदक पिठी मिळते पण आपण हेच पीठ सोप्या पद्धतीने घरीच तयार करणार आहोत.
[0:20]त्यासाठी कुठला तांदूळ वापरायचा, किती प्रमाणात वापरायचा हे सगळं मी सविस्तरपणे सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे ही मोदक छान मऊ लुसलुशीत आणि छान वळणदार बनतील.
[0:38]तसं तर कुठल्याही तांदळाच्या पिठाचे मोदक बनतात पण जर आपल्याला स्पेशल मोदक बनवायचे असतील तर त्यासाठी पीठ सुद्धा स्पेशल हवं.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]गौरी गणपती जवळ येत आहेत आणि गणपतीत सगळ्यात जास्त महत्त्वाचा मेनू म्हणजे उकडीचे मोदक जे गणपती बाप्पाला आणि सर्वांनाच खूप खूप खूप आवडतात.

[0:09]तर हेच उकडीचे मोदक मऊ लुसलुशीत छान कळीदार आणि सुगंधी होण्यासाठी बाजारात तयार मोदक पिठी मिळते पण आपण हेच पीठ सोप्या पद्धतीने घरीच तयार करणार आहोत.

[0:20]त्यासाठी कुठला तांदूळ वापरायचा, किती प्रमाणात वापरायचा हे सगळं मी सविस्तरपणे सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे ही मोदक छान मऊ लुसलुशीत आणि छान वळणदार बनतील.

[0:34]नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत.

[0:38]तसं तर कुठल्याही तांदळाच्या पिठाचे मोदक बनतात पण जर आपल्याला स्पेशल मोदक बनवायचे असतील तर त्यासाठी पीठ सुद्धा स्पेशल हवं.

[0:47]सुगंधी मोदक पिठीसाठी इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती ह्या तांदळाचा वापर केला जातो.

[0:56]या तिघांपैकी कुठल्याही एक प्रकारचा तांदूळ वापरून पण पीठ बनतंय पण ह्या तिघांचेही गुणधर्म वेगवेगळे आहेत ते मी पुढे सांगणारच आहे.

[1:02]तर हे बघा, इथे मी तीन प्रकारचे तांदूळ घेतलेले आहेत.

[1:06]हा आहे आंबेमोहर तांदूळ ह्याच्याने मोदक छान मऊ आणि पांढरे शुभ्र होतात.

[1:13]हा साधारणतः 85 रुपये किलोने मिळतो. त्यानंतर हा आहे इंद्रायणी तांदूळ हा वापरल्याने पिठीला छान चिकटपणा येतो आणि मोदक सुबक वळता येतो.

[1:24]हा साधारणतः 50 ते 55 रुपये किलोला मिळतो.

[1:27]त्याच्यानंतर हा आहे बासमती तुकडा.

[1:30]बासमती अख्खा तांदूळ घ्यायची गरज नाही कारण आपण त्याचं पीठच तयार करणार आहोत.

[1:36]हा बासमती तुकडा साधारणतः 60 ते 70 रुपये किलोला मिळतो आणि हे तीनही तांदळाचे प्रकार आपल्याला किराणा दुकानात सहज मिळतात.

[1:45]आता फक्त बासमती तांदळाचे मोदक जर केले तर ते सुगंधी तर होतात पण दिसायला थोडेसे गढूळ दिसतात आणि मोदक जरा कडक होतो.

[1:53]फक्त इंद्रायणी तांदळाचे मोदक बनवले तर ते जास्तच नरम होतात, त्यामुळे हे तीनही तांदूळ एकत्र करून पीठ बनवले तर त्याचे मोदक अगदी परफेक्ट बनतात.

[2:04]आता ह्याचा प्रमाण कसं घ्यायचं. लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे.

[2:09]काय करायचं सगळे तांदूळ सेम प्रमाणात घ्यायचे.

[2:12]मी इथे प्रत्येकी पाव-पाव किलो तांदूळ घेतलेले आहेत.

[2:16]आता हे सगळे तांदूळ आपण एकत्र करून धुणार आहोत, वेगवेगळे धुवायची गरज नाही.

[2:24]धुता वेळेस खूप जास्त चोळून धुवायचे नाही नाहीतर मग त्याच स्टार्च सगळं निघून जाईल.

[2:28]अगदी अलगतपणे दोन पाण्यात धुऊन एका चाळणीवर हे तांदूळ काढून घेऊन निथळायला ठेवायचे.

[2:35]तांदूळ घेताना जमल्यास नवीन तांदूळ घ्यायचा जुन्या तांदळाला जास्त चिकटपणा नसतो.

[2:40]तरी पण आपल्याला जर माहित नसेल तांदूळ जुना आहे की नवीन आहे त्यासाठी काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे.

[2:46]साधारण अर्धा तास चाळणीत तांदूळ व्यवस्थित निथळल्यानंतर एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर हे तांदूळ पसरवून घ्यायचे.

[2:56]तांदूळ सुकवताना ते घरातच फॅन खाली सुकवायचे, उन्हात अजिबात सुकवायचे नाहीत.

[3:00]सुकवायला दोन दिवस लागले तरी चालतील पण सावलीतच सुकवायचे.

[3:04]हे बघा असे पातळसर पसरवले की एक दिवसात पण सुकतात पण बाहेर जास्त पाऊस असला, वातावरणात गारवा असेल तर तांदूळ सुकायला दोन दिवस लागू शकतात.

[3:14]तांदूळ लवकर सुकण्यासाठी तांदळांवर अधून मधून हात फिरवायला विसरू नका.

[3:19]हे बघा दोन दिवसानंतर आपले तांदूळ घरातच फॅन खाली पूर्णपणे सुकलेले आहेत.

[3:26]आता आपल्याला माहीत नसेल की तांदूळ जुना आहे की नवीन आहे त्यामुळे आपण यात घालणार आहोत एक चमचा साबुदाणा.

[3:33]चमचा बघू शकता तुम्ही खूप छोटा नाही आणि खूप मोठा ही नाही आपण नेहमी कांदेपोहे खातो तो चमचा आहे.

[3:41]साबुदाणा घालताना तो प्रमाणातच घाला.

[3:44]आपले तीनही प्रकारचे पाव-पाव किलो तांदूळ आहेत म्हणजे एकत्रित करून पाऊण किलो आहेत.

[3:50]म्हणजे पाऊण किलो तांदळासाठी कांदेपोहे खाण्याचा एक चमचा साबुदाणा पुरेसा आहे.

[3:57]कारण ह्याच्या पेक्षा जास्त साबुदाणा घातला तर पीठ खूप जास्त चिकट होईल आणि मोदक थंड झाल्यानंतर चिवटसर होऊ शकतो.

[4:05]आता हे सर्व मिक्स करून गिरणीवरून छान बारीक दळून आणते.

[4:09]दळायला देताना त्याला आठवणीने सांगायचं की हे मोदकच पीठ आहे, तर हे तांदळानंतरच दळा गव्हावर अजिबात टाकू नका.

[4:17]गिरणीतून पीठ तयार करून आणल्यानंतर तसेच भरून ठेवायचं नाही तर ते छान बारीक चाळणीतून आधी चाळून घ्यायचे त्यानंतरच डब्यात भरायचे.

[4:26]असं केल्याने आपल्या पिठात पाखरं होणार नाहीत, शिवाय हे पीठ एक महिनाभरासाठी तरी अजिबात खराब होणार नाही.

[4:33]चला तर मग लगेच तयारीला लागा, लगेच जाऊन तांदूळ घेऊन या, स्वच्छ धुऊन सुकवून पीठ तयार करा आणि ह्या गणेश चतुर्थीला आपल्या लाडक्या बाप्पाला असे सुगंधी मोदक तयार करा.

[4:44]आणि हो याचं पिठापासून सुंदर मोदक कसे बनवायचे हे मी पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे, त्यामुळे ते बघण्यासाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे मी मोदकची व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन तेव्हा ते तुम्हाला लगेच बघायला भेटेल.

[4:59]व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा.

[5:02]पुन्हा भेटूया सुंदर मोदकच्या रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript