Thumbnail for एकीचे बळ I Unity Is Strength I Moral Stories I Marathi I Marathi Goshti I Cartoon by Ryan Kids Club

एकीचे बळ I Unity Is Strength I Moral Stories I Marathi I Marathi Goshti I Cartoon

Ryan Kids Club

1m 24s114 words~1 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:03]एका पाठोपाठ एक प्रत्येक मुलाने काठी तोडण्याचा प्रयत्न केला व प्रत्येकाने ती काठी सहजपणे तोडली.
Use this transcript
Related transcript hubs

[0:03]एकीचे बळ एका गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता. त्याला चार मुले होती. ते चौघे नेहमी आपापसात भांडत असत. त्यामुळे रामू खूपच दुखी होता. एके दिवशी त्याने चौघांना बोलावले. त्याने प्रत्येकाला एक छोटी काठी दिली. तो त्यांना म्हणाला या काठीला तुम्ही तोडून दाखवा. एका पाठोपाठ एक प्रत्येक मुलाने काठी तोडण्याचा प्रयत्न केला व प्रत्येकाने ती काठी सहजपणे तोडली. आता रामूने काही काठ्या एकत्र बांधल्या. तो चौघांना म्हणाला आता तुम्ही या एकत्र बांधलेल्या काठ्यांची मोळी तोडून दाखवा. प्रत्येक मुलाने काठ्यांची मोळी तोडण्याचा अतोनात प्रयत्न केला. परंतु कोणालाही त्या एकत्र बांधलेल्या काठ्यांना तोडणे शक्य झाले नाही. रामू म्हणाला यावरून तुमच्या काही लक्षात आले का? जर तुम्ही नेहमी एकीने राहिलात तर तुमचे कोणीही नुकसान करू शकत नाही.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript