Thumbnail for इयत्ता आठवीच्या पुस्तकाचा संपूर्ण सार (भाग 01) 8th class history notes in marathi, History 8th class by marathi spardha jagat

इयत्ता आठवीच्या पुस्तकाचा संपूर्ण सार (भाग 01) 8th class history notes in marathi, History 8th class

marathi spardha jagat

16m 6s1,326 words~7 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Timestamped outline
[0:05]Section 1

मित्रांनो आपण येथे पहिला पाठ स्किप केलेला आहे कारण त्यामध्ये विशेष असं काही नाही जे की आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि जे जाणून घेण्यासार...

[3:02]Section 2

पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला.

[5:59]Section 3

आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित कर...

[9:01]Section 4

मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले.

[11:47]Section 5

या पहिल्या शीख-इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला. दलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले.

[14:21]Section 6

१८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु हा तह काही मराठा सरद...

Pull quotes
[0:05]मित्रांनो आपण येथे पहिला पाठ स्किप केलेला आहे कारण त्यामध्ये विशेष असं काही नाही जे की आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि जे जाणून घेण्यासारखं आहे ते आपल्याला ऑलरेडी माहीत आहे.
[0:16]तर आपण युरोप आणि भारत या दुसऱ्या चाप्टर पासून या आठवीच्या इतिहासाला सुरुवात करत आहोत.
[0:24]प्रबोधनयुग: युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते.
[0:35]या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला.
Use this transcript
Related transcript hubs

[0:05]मित्रांनो आपण येथे पहिला पाठ स्किप केलेला आहे कारण त्यामध्ये विशेष असं काही नाही जे की आपल्याला जाणून घ्यावं लागेल आणि जे जाणून घेण्यासारखं आहे ते आपल्याला ऑलरेडी माहीत आहे.

[0:16]तर आपण युरोप आणि भारत या दुसऱ्या चाप्टर पासून या आठवीच्या इतिहासाला सुरुवात करत आहोत.

[0:24]प्रबोधनयुग: युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते.

[0:35]या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’ असे म्हणतात.

[0:49]प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली.

[1:05]प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला.

[1:14]प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले.

[1:23]लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले.

[1:33]इसवी सन १४५० च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला.

[1:41]छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वंपर्यत पोहोचू लागले.

[1:52]इसवी सन १४५३ मध्ये ऑटोमन तुर्कानी बायझंटाइन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्कीचे व्यापारी मार्ग जात.

[2:11]तुर्कानी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले.

[2:27]लिओनार्डो-द-विंची हे प्रबोधनकाळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता.

[2:38]शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व होतेच परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला.

[2:53]त्याच्या ‘मोनालिसा’ व ‘द लास्ट सपर’ या चित्राकृती अजरामर ठरल्या.

[3:02]पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला.

[3:08]प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले.

[3:16]या संपूर्ण बदलांना ‘वैचारिक क्रांती’ असे संबोधले जाते.

[3:24]१८ व्या तसेच १९ व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड ‘क्रांतियुग’ म्हणून ओळखला जातो.

[3:33]या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला.

[3:43]इ.स. १६८९ च्या बिल ऑफ राईटसमुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले.

[3:56]अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले.

[4:06]साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या.

[4:16]इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर तेरा वसाहती स्थापन केल्या. सुरुवातीस इंग्लंडचे या वसाहतींवर नाममात्र वर्चस्व होते. परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतींवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली.

[4:38]अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला. इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहतींविरोधात युद्ध पुकारले.

[4:49]अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला. अखेरीस वसाहतींच्या सैन्याचा विजय झाला. ही घटना ‘अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध’ म्हणून ओळखली जाते.

[5:05]यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासनपद्धती, लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश अस्तित्वात आला.

[5:19]फ्रेंच राज्यक्रांती इ.स. १७८९ मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना ‘फ्रेंच राज्यक्रांती’ म्हणून ओळखली जाते.

[5:39]फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली.

[5:48]वसाहतवाद एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय.

[5:59]आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच ‘वसाहतवाद’ होय.

[6:14]युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी वृत्तीतून साम्राज्य्यवाद उदयास आला.

[6:24]ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती.

[6:33]इ.स. १६०० मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती.

[6:43]या कंपनीने जहांगीर बादशाहाकडून परवानगी मिळवून सुरत येथे वखार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे.

[6:58]इंग्रज फ्रेंच संघर्ष भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.

[7:07]या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली. ती युद्धे ‘कर्नाटक युद्धे’ म्हणून ओळखली जातात.

[7:18]तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही.

[7:32]प्लासीची आणि बक्सारची लढाई बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता.

[7:39]इ.स. १७५६ साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला.

[7:48]ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहाकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत.

[7:58]इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. यामुळे सिराज उद्दौैलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली.

[8:15]या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले.

[8:31]इ.स. १७५७ मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौैलाचा पराभव झाला.

[8:48]इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले.

[9:01]मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले.

[9:11]बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशहा शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली.

[9:26]इ.स. १७६४ मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांचा विजय झाला.

[9:37]या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला.

[9:56]इंग्रज-म्हैसूर संघर्ष म्हैसूर राज्यातील हैदरअलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले.

[10:04]हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला.

[10:10]त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शर्थीने लढवला. अखेर १७९९ मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला.

[10:22]अशा रीतीने म्हैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले.

[10:30]सिंधवर इंग्रजांचा ताबा भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले.

[10:39]रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती, म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले.

[10:51]अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि १८४३ साली त्यांनी सिंध गिळंकृत केला म्हणजेच जिंकला.

[11:09]शिख सत्तेचा पाडाव एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती.

[11:17]रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला.

[11:23]त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदून राज्याचा कारभार पाहू लागली, मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही.

[11:34]ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार, असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला.

[11:47]या पहिल्या शीख-इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला. दलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले.

[11:56]पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. मुल्तानचा अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले.

[12:07]हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले.

[12:15]१८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला.

[12:24]इंग्रज व मराठे मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते.

[12:29]त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती.

[12:39]माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला.

[12:53]१७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली.

[13:03]पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज-मराठा युद्ध संपले.

[13:17]तैनाती फौज १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

[13:24]सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते.

[13:31]त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या.

[13:46]भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा.

[14:00]त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे, आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट (प्रतिनिधी) ठेवावा अशा त्या अटी होत्या.

[14:14]भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले.

[14:21]१८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे; परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले.

[14:40]त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

[14:51]या युद्धात त्याचा पराभव झाला. १८४८ मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती.

[15:05]शिंधांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला.

[15:17]छत्रपती प्रतापसिंह पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते.

[15:26]इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली.

[15:36]परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा १८४७ मध्ये मृत्यू झाला.

[15:48]छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला.

[15:58]परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.

[16:06]पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तकविधान नामंजूर करून १८४८ मध्ये सातारचे राज्य खालसा केले.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript