Thumbnail for तहानलेला कावळा Thirty Crow  - Marathi Goshti गोष्टी | Chan Chan Goshti | Ajibaicha Goshti by Sonic Octaves Kids Marathi

तहानलेला कावळा Thirty Crow - Marathi Goshti गोष्टी | Chan Chan Goshti | Ajibaicha Goshti

Sonic Octaves Kids Marathi

2m 27s266 words~2 min read
YouTube auto captions
Transcript source

YouTube auto captions

This transcript was extracted from YouTube's auto-generated caption track. The transcript below is server-rendered so it can be read, searched, cited, and shared without opening the original YouTube player.

Pull quotes
[0:00]Sonic Octaves Kids चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
[0:00]अरे वा तिथे पाण्याचा भांड दिसतंय त्यामुळे त्यातलं पाणी मला मिळू शकेल असं म्हणून तो उडाला आणि त्या पाण्याच्या माठाच्या काठावर येऊन बसला.
[0:00]मग त्याला लक्षात आलं की पाण्याची पातळी वर येण्यासाठी त्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे.
[0:00]बरेच दगड टाकल्यावर त्याच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी आधीपेक्षा बरीच वर आली आहे.
Use this transcript
Related transcript hubs

[0:00]Sonic Octaves Kids चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन कार्टून व्हिडिओ सर्वात लवकर बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. गोष्टीचं नाव आहे तहानलेला कावळा. कोणी एके काळी जंगलात एक कावळा राहत होता. त्याला एकदा खूप तहान लागली. तो पिण्यासाठी म्हणून पाणी इकडे तिकडे शोधू लागला. पण त्याला कुठेच पिण्यासाठी पाणी मिळालं नाही. तो खूप दुःखी झाला आणि एका मोठ्या झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. अचानक त्या कावळ्याने काही अंतरावर बागेत एक माठ पाहिला. अरे वा तिथे पाण्याचा भांड दिसतंय त्यामुळे त्यातलं पाणी मला मिळू शकेल असं म्हणून तो उडाला आणि त्या पाण्याच्या माठाच्या काठावर येऊन बसला. त्याने तिथे पाहिलं की त्या भांड्याच्या तळास थोडंसं पाणी आहे. तो विचार करू लागला. हे पाणी मला कसं पिता येईल माझी सोच तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही. मग त्याला लक्षात आलं की पाण्याची पातळी वर येण्यासाठी त्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. त्याने थोडा वेळ विचार केला आणि त्याला एक छानशी कल्पना सुचली. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर त्याला जमिनीवर लहान लहान खडे सगळीकडे पडलेले दिसले. त्याने एक एक दगड सोचीने उचलला आणि तो पाण्यात टाकायला सुरुवात केली. बरेच दगड टाकल्यावर त्याच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी आधीपेक्षा बरीच वर आली आहे. आणि त्याच्या हेही लक्षात आलं की जर आपण आणखी दगड त्यात टाकले तर पाण्याची पातळी आणखी वर येईल. म्हणून त्याने परत एक एक दगड उचलून माठात टाकायला सुरुवात केली. जरा वेळाने त्याच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी इतकी वर आली आहे की त्याची चोच सहज पाण्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तो आपली तहान भागवू शकेल. अशा रीतीने तो पाणी प्यायला आणि समाधानाने उडून गेला. इतका छोटासा कावळा पण त्याने कशी शक्कल लढवली ना? तर मुलांनो गोष्टीचं तात्पर्य काय की गरज ही शोधाची जननी असते.

Need another transcript?

Paste any YouTube URL to get a clean transcript in seconds.

Get a Transcript